Wednesday, January 18, 2012

आज शके १९३३ कृष्ण पक्ष एकादशी (पौष)

आज शके १९३३ कृष्ण पक्ष एकादशी (पौष), दि. १९ जाने २०१२, सूर्योदय ०६:५२ सूर्यास्त ५ :५१

संतांचे अभंग……एकादशी निमित्ताने..

खेळ मांडीयेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे ।
क्रोध अभिमान गेला पावटणी, एकएका लागतील पायी रे ॥१॥

नाचती आनंद कल्लोळा पवित्र गाणे वनमाळी रे ।
कळी कामावरी घातली काम एक एकाहुनी बळी रे ॥२॥

गोपीचंदन उटी तुळशीच्या माळा, हार मिरविती गळा रे ।
टाळ मृदुंग घाई पुष्प वर्षाव, अनुपम्य सुखसोहळा रे ॥३॥

लुब्धली नादी लागली समाधी मुढजन नारी लोका रे ।
पंडीत ज्ञानी योगी महनुभव एकची सिद्ध साधका रे ॥४॥

वर्ण अभिमान विसरली याती, एकेका लोटांगणी जाती रे ।
निर्मळ चित्ते झाली नवनीते, पाषाणा पाझर सुटती रे ॥५॥

होतो जयजयकार गर्जत अंबर, मातले हे वैष्णव वीर रे ।
तुका म्हणे सोपी केली पायवाट, उतरावया भवसागर रे ॥६॥

No comments:

Post a Comment