Saturday, January 7, 2012

आज शके १९३३, माघ शुक्ल पक्ष त्रयोदशी

आज शके १९३३, माघ शुक्ल पक्ष त्रयोदशी, सूर्योदय ६.५२, सूर्यास्त ५.४१, दि. ०७ जाने २०१२.

आजचा अभंग

खेळ मांडीयेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे
क्रोध अभिमान गेला पावटणी, एक एका लागतील पायी रे
गोपीचंदन उटी तुळशीच्या माळा, हार मिरविती गळा
टाळ मृदुंग घाई पुष्पवर्षाव, अनुपम्य सुखसोहळा रे
वर्ण अभिमान विसरलीया ती, एक एका लोटांगणी जाती
निर्मळ चित्ते झाली नवनीते, पाषाणा पाझर फुटती रे
होतो जयजयकार गर्जतो अंबर, मातले हे वैष्णव वीर रे
तुका म्हणे सोपी केली पायवाट, उतरावया भवसागर रे

No comments:

Post a Comment