Wednesday, December 28, 2011

दि. २९ डिसें. २०११ (पौष शुक्ल पक्ष पंचमी, १९३३)

दि. २९ डिसें. २०११ (पौष शुक्ल पक्ष पंचमी)
आज शके १९३३ पौष शुक्ल पक्ष पंचमी, सूर्योदय ७.१२, सूर्यास्त ०६.०७

|| आजचा अभंग ||

विठ्ठल तो आला, आला, मला भेटण्याला
मला भेटण्याला आला, मला भेटण्याला

तुळसी-माळ घालुनि गळा कधी नाही कुटले टाळ
पंढरीला नाही गेले चुकूनिया एक वेळ
देव्हाऱ्यात माझे देव त्यांनी केला प्रतिपाळ
चरणांची त्यांच्या धूळ रोज लावी कपाळाला

सत्य वाचा माझी होती वाचली न गाथा पोथी
घाली पाणी तुळशीला आगळीच माझी भक्ती
शिकवण जन्माची ती बंधुभाव सर्वांभूती
विसरून धर्म जाति देई घास भुकेल्याला

गीत - पी. सावळाराम
संगीत - वसंत प्रभू
स्वर - लता मंगेशकर

http://www.esnips.com/displayimage.php?pid=2928861

No comments:

Post a Comment