Tuesday, August 7, 2012

‘मन माझे चपळ न राहे निश्चळ ।

‘मन माझे चपळ न राहे निश्चळ ।
घडी एकी पळ स्थिर नाही ॥
आता तू उदास नव्हे नारायण ।
धावे मज दीना गांजियेले ॥
धाव घाली पुढे इंद्रियांचे ओढी ।
केले तडातोडी चित्त माझे ॥
तुका म्हणे माझा न चले सायास ।
राहिलो मी आस धरूनी तुझी ॥
हा अभंग सोपा व सुलभ आहे. यात महाराजांची निराशा उत्कटपणे व्यक्त झाली आहे. ‘रामकृष्ण हरी’ या मंत्राचा जप करूनही मन ताळ्यावर येत नाही, म्हणून महाराज शेवटी विठ्ठलालाच शरण गेले! मन हे असे दुर्धर्ष व बलदंड असते. मनाशी दोन हात करणे हे सोपे काम नसते! फार मोठे पुण्यबळ, गुरुकृपेचे चंद्रबळ गाठी असल्याशिवाय मनोजय केवळ अशक्य!

Saturday, March 31, 2012

आज शके १९३४ शुक्ल पक्ष नवमी (चैत्र), दि. १ एप्रिल २०१२.


आज शके १९३४ शुक्ल पक्ष नवमी (चैत्र), दि.  १ एप्रिल २०१२......... विसरू नको, श्रीरामा, मला ...
मी तुझ्या पाउली जीव वाहिला, ..
प्रिया !.....
तू सांब भोळा, उमा पार्वती मी...
तू कृष्ण काळा, तुझी राधिका मी...
युगायुगांचे नाते, आपुले, वेगळे ...
जुळे श्यामला !........प्रिया !..........गीत - सुधीर मोघे

Wednesday, March 28, 2012

कवी ग्रेस यांना भावपूर्ण श्रद्धांजली

कवी ग्रेस या कवींचे साहित्य खूप पटणारे आहे, यांच्या कविता खूप खोल भावनांची दारं उघडणाऱ्या होत्या, कवी ग्रेस यांना भावपूर्ण श्रद्धांजली.......... एक हात तुझा एक हात माझा.....
जसा शब्द खुजा शब्दापाशी.......
एका हृदयाला एकच क्षितिज......
आकाशाचे बीज तुझ्या पोटी....
एका कुशीसाठी एकाचे निजणे....
बाकीची सरणे स्मशानात........  आज शके १९३४ शुक्ल पक्ष षष्ठी (चैत्र), दि.  २८ मार्च २०१२...

Saturday, March 10, 2012

आज शके १९३३ शुक्ल पक्ष चतुर्थी (फाल्गुन)

आज शके १९३३ शुक्ल पक्ष चतुर्थी (फाल्गुन), दि. ११ मार्च २०१२.............

अवघा रंग एक झाला । रंगी रंगला श्रीरंग ॥१॥ मी तूंपण गेलें वायां । पाहतं पंडरीच्या राया ॥२॥ नाही भेदाचें तें काम । पळोनी गेले क्रोध काम ॥३॥ देही असुनी तूं विदेही । सदा समाधिस्थ पाही ॥४॥ पाहते पाहणें गेले दुरी । म्हणे चोख्याची महारी ॥५॥

Friday, March 9, 2012

आज शके १९३३ शुक्ल पक्ष द्वितीया/तृतीया (फाल्गुन), दि. १० मार्च २०१२

प्रौढ प्रताप पुरंदर गोब्राह्मण प्रतिपालक क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांचा आज जन्मदिवस उभ्या महाराष्ट्राने पाहिलेला त्यांचा प्रताप हा या भूमीला साजेसा असून त्यांना आज शके १९३३ शुक्ल पक्ष द्वितीया/तृतीया (फाल्गुन), दि. १० मार्च २०१२............. या सुवर्णमुहूर्ता समयी मानाचा मुजरा

Saturday, March 3, 2012

आज शके १९३३ शुक्ल पक्ष एकादशी (फाल्गुन), दि. ४ मार्च २०१२....

आज शके १९३३ शुक्ल पक्ष एकादशी (फाल्गुन), दि. ४ मार्च २०१२..............तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम
देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम

देहधारी जो-जो त्यासी विहीत नित्यकर्म
सदाचार नीतीहुनी आगळा ना धर्म
तुला आठवावे, गावे, हाच एक नेम

तुझे नाम पांडुरंगा सर्व ताप नाशी
वाट प्रवासासी देती स्वये पाप राशी
दिसो लागली तू डोळा अरुपी अनाम

तुझ्या पदी वाहिला मी देहभाव सारा
उडे अंतराळी आत्मा, सोडुनि पसारा
नाम तुझे घेतो गोरा, म्हणूनी आठयावं

” संत गोरा कुंभार “

Friday, February 17, 2012

आज शके १९३३ कृष्ण पक्ष एकादशी (माघ)

आज शके १९३३ कृष्ण पक्ष एकादशी (माघ), दि. १८ फेब्र २०१२.......

आजचा अभंग.........

आजची गौळण

रूपे सुंदर सावळा गे माये, सावळा गे माये....... वेणू वाजवी वृंदावना..............
व्रीन्वाना गोधने चरिता............. सावळा गे माये.ssssssssss

रुणझुण वाजवी वेणू
वेधी वेधले अमुचे तन्माणु ओ माये.......
सावळा गे माये.ssssssssssरूपे सुंदर सावळा गे माये, सावळा गे माये...

गोधने चारी हाती घेऊन काठी
वैकुंठाचा सुकुमार गोश्वेशे जगजेठी
वैकुंठाची सुकुमार गोधने चारीताहे

सावळा गे माये.ssssssssssरूपे सुंदर सावळा गे माये, सावळा गे माये...

एक जनार्दनी गौळणी
करितु तनमनाची बोलावणी वो माये....
सावळा गे माये.ssssssssssरूपे सुंदर सावळा गे माये, सावळा गे माये...
- संत एकनाथ